माझे भाव

कधी पोहचतील तुझवर माझे भाव,
तुझे ठिकाण ना त्यांस ठाव ,
संक्षेपातच सांग गावाचे नाव ,
मग बघ कसा उधळतो नियतीचा डाव .

किती आशेने मांडलेला डाव आपला ,
होता त्याला फुला सारखा जपला ,
पण कोणास ठाऊक का दैव कोपला ,
त्यानेही सर्व शक्तीने आपणास चोपला .