उत्तर दे

तूच सांग आता कसे जगू,
हवाय आधार कोणाकडे मागू,
जशी तुला केली दूर,
नाही राहीलो पूर्वीसारखा शूर.

प्रेमात पडण्याची नव्हती इच्छा,
कारण विद्येचा होतो भक्त सच्च्या,
पण पुढे देवभक्तीतून झालो वजा,
आणि तुझीच करण्या लागलो पूजा.

त्यानंतर नाही कोणावर शाइनिंग मारली,
तुझ्याशिवाय कोणीच ना मनी उरली,
प्रेमात पडल्यावर हरवले सारे भान,
अन लागलीच गमावले यशाचे मान.

पैसा होता क्षुल्लक भले नव्हता हाती,
वाटले पैशाला असेल मोल माती,
पण तू भेटल्यावर आठवली भाकरी,
तुझ्यासाठी गरजेची होती नोकरी.

वाटलेले नाही महत्वाची जात,
आयुष्य जाईल गाणे गात,
पण तुझ्यामुळेच आठवली जगाची रीत,
त्यामुळे फिके पडले आशादाई गीत.

तूच सांग आता जगू कसे,
माला वाटते रंगाविणा फूल जसे,
आणखीही असेच से वाटते,
कळव  तुला काय पटते.