एक प्रयत्न

वर्गात माझ्या आहे एक परी,
सिनेमांतील नट्यांपेक्षा बरी,
कळत नाही तीचं वर्णन कसं करु,
कोणते सोडू कोणते शब्द हाताशी धरू.

काळे काळे डोळे छान,
ज्यांना पाहताच हरपून बसलो भान,
करावी न लागो त्या नजरेची मापणी,
चुकूनही न लागो माझ्यासारखी ढापणी.

पाहिले लांब सडक ते सुट्टे केस,
अन् मीही बदलला माझा गबाळा भेस,
एक दिवस माळेन गजरा केला संकल्प,
पण कधीही न लावावा लागो त्यांस कल्प.

काम उरलाय चोरून बघणे तिचा चेहरा,
ज्याने असर केलाय माझ्यावर गहरा,
त्या चेहर्‍याची तारीफ करतात सारी,
कधीही न वापरो सौंदर्य प्रसाधने भारी.

जगासारखेच तरीही वेगळे वाटतात ओठ,
तुलनेसाठी माझ्या ओठांवर फिरवला बोट,
त्या ओठांची नजर दिवानी झाली,
कधीही न लावावी लागो त्यांस लाली.

जेव्हा गोरे गोरे दिसतात हात,
मिटता मिटत नाही डोळ्यांची पात,
त्यांसाठी नसावा मोळ्यांचा भारा,
पण कधीही न लागो आळसाचा वारा.

एवढे सुंदर दिसले तिचे तन,
त्यापेक्षा सुंदर अनुभवले मन,
त्याचे वर्णन करताना शब्द पडतात अपुरे,
यापुढेही तिने विचार टाळावे भले-बुरे.

तिच्या वर्णनाचा हा एक अपुरा प्रयत्न,
कारण ती तर आहे एक मौल्यवान रत्न,
या रत्नासाठी नाही लायकी पुरेशी,
याच गोष्टीची खंत वाटते जराशी