एक वळण

नव्हते ते अनोळखी वळण,
जीथे घडले आपले मिलन,
होता तो एफ वाय चा वर्ग,
प्रवेश करताच वाटले होते स्वर्ग.

याला आहेस तूच कारण,
मात्र होतोय माझ मरण,
मरणही नाही अस तस,
नर्कातील मरण वाटतय जस.

पहिल्या भेटीला वर्षे झाली सात-आठ,
वियोगानंतर आत्ता वर्गात पडली गाठ,
तशी क्वचित दिसली होतीस,
मात्र माझ्या मनात नव्हतीस.

आता आली होतीस मनी,
मात्र सामर्थ्य नव्हते माझ्या तनी,
म्हणूनच हृदयला ठेचला,
आणि तूझा वियोग सोसला.