एक संध्याकाळ

दुपारी जेवल्यावर झोप आली,
ती थेट संध्याकाळी जाग आली,
ऊठून बाथरूम मध्ये गेलो,
फ्रेश होऊन बाहेर आलो.

घरात आत बाहेर फेरी मारली,
माझ्याशिवाय कोणीच नव्हती उरली,
गावात होतं लग्न,
सगळी होती त्यात मग्न.

थोड्याच वेळात नवरा नवरीला घेऊन गेला,
गाण्यांचा आवाज ही बंद झाला,
नवरीला घालवायला ऊरलेली शेजारीही गेली,
मी नाही गेलो, मनावर मरगळ होती आली.

मन गुदमरले थोडे,
का ? हेच होते एक कोडे,
म्हणून बाहेर येऊन कट्ट्यावर बसलो,
इतर कोणी नव्हतं म्हणून निसर्गावर रूसलो.

सुटला होता सोसाट्याचा वारा,
तो विनाकारण झोंबतच होता जरा,
सूर्य डोंगरावर स्थिरावला,
मी ही एक दृष्टिक्षेप फिरवला.

डोंगराआड जाऊ लागला तो हळू हळू,
का कोणास ठाऊक माझे मन ही लागले जळू,
डोकं भिनभिणू लागले,
चक्कर नव्हती तरी अंधुक झाले सगळे.

तसेच काही वेळ झाले,
म्हणून डोळे बंद केले,
मनाची हुर-हुरी आणखीनच वाढली,
बुद्धीने कसली तरी आठवण काढली.

पण लगेच कळेना ती होती कसली,
नंतर कोणाची तरी अंधुक छबि दिसली,
काहीच वेळात छबिवर पडला प्रकाश,
आणि लगेच निरभ्र झाले आकाश.

मनाला अचानक बसला धक्का,
कारण प्रेमाचा इतिहास उभारलेला अख्खा,
उभारलेली छबि होती तिची,
आठवण ही काढायची नाही ठरलेले जिची.

पण त्यात कधी ही यशस्वी नाही झालो,
म्हणूनच आता रडपेंदीस आलो,
लगेचच डोळे पाणावले,
पाठी कोण आहे हे ही नाही जाणवले.

पाठून समोर आली आई,
आश्रू पुसण्याची केली मी घाई,
पण माझ्या आधीच तिने डोळे पुसले,
हे पाहून डोके तिच्या खांद्यावर वसले.

मग तर रडणे नाही आवरले,
कसतरी तीनेच सावरले,
तिने रडण्याचे कारण मागितले,
मी तिला काहीच नाही सांगितले.

ती वेळ मी कशीतरी टाळली,
सांगितलं अभ्यासातील चूक मला कळली,
म्हणून मन भरून आले,
याशिवाय काही नाही झाले.

कारण खरं सांगून नव्हता काही फायदा,
कळून चुकलेला प्रेमाचा कायदा,
त्यानंतर कासातरी सावरलो,
“संध्याकाळ” आठवणीच्या भीतीने आई शेजारीच वावरलो.