परक्या

काल रात्री झोप नाही लागली,
रात्रही गेली नाही चांगली,
काचेच्या कौलातून वरच्या चांदनीला पाहिली,
मला माझ्या चांदणीची आठवण येत राहिली.

लहानपणी स्वप्नांच्या जगात वावरलो,
घरच्यांनाही नाही कधी आवरलो,
नको-नको ते वेड होते मला,
अंगी मात्र नव्हत्याच कोणत्या कला.

लहानपणी एकदा वरची चांदणी आवडली,
तिला मी स्वप्नात होती पकडली,
शीतल तेजात तीने मला गोठवल,
पण लगेच आईने झोपेतून उठवल.

लहानपण गेल झालो युवक,
त्याबरोबरच वाढली विचारांची आवक,
वरची चांदणी स्वप्नातच दिसते बरी,
आता मला हवी होती जमीनीवरची परी.

अशातच एकदा ती दिसली,
आणि ती मनातच ठसली,
मनातून जा म्हणता जाईना,
अस्तित्त्वात जवळ ही येइना.

अशातच एकदा विरहाई आली,
ती दूर गेली पण तीची आठवण नाही गेली,
चांदणी आणि ती दोघीही होत्या सारख्या,
एवढ्या आवडूनही शेवटी झाल्या परक्या.