प्रेमाचा कायदा

कसा पडेल तीचा विसर,
तीनेच केलाय गहरा असर,
भलेही अठवून नाहीच काही फायदा,
पण विसरता नाही येत प्रेमाचा कायदा.

कायदा सांगतो आठव ती भेट पहीली,
जीच्यानंतर रोज देवाला फूले वाहिली,
देवाला सांगितलं हीच पाहीजे राणी,
दोघांसाठीही गायली खूप प्रेमाची गाणी.

कायदा सांगतो आठव तुझी ती तयारी,
तयार झालास अभ्यासाशी तोडायला यारी,
तयार होतास घराच्या बाहेर पडायला,
तयार होतास आईची माया सोडायला.

कायदा सांगतो आठव तिला सुखी ठेवण्याची इच्छा,
ज्याने वाटत होतो प्रेमी सच्चा,
तयार होतास तिच्यासाठी काहीही करायला,
वेळ आल्यास मरायला आणि मारायला.

मग कायदा म्हणतो तयार नव्हतास अशाला,
बेरोजगारांनी प्रेम करायच कशाला,
कायदा विचारतो ‘तीला काय देऊ शकत होतास’,
‘तू तर स्वत:च्या पायावरही उभा नव्हतास.