बरे आहोत

आम्ही कोणत केलय पाप,
त्या पापाचं करावं कोणी मोज माप,
दिवसावर दिवस चाललेत फुकट,
अता नाही रहावत मुकट.

शाळा संपून कॉलेज झालाय सुरू,
मन धावायला लागलाय तुरुतूरू,
कोणीतरी आम्हाला पसंत करावे,
कोणीतरी आमच्यावरही मरावे.

पैसेवाला नाही मी कळतं मला,
पण तुमच्यासाठी “काय पण” धरून चला,
शेवटी नशीब नसतं आपल्या हाती,
उगीच का हे पक्षी विनवणी गीत गाती.

विश्वास ठेवा आम्हीही तसे बरे आहोत,
प्रतिस्पर्धी भले दुष्ट नजरेने पाहोत,
शेवटी याही छातीत आहे हृदय,
सगळयांनीच बनू नये असे निर्दय.