यश येईल कधी

कोणी म्हणे मी फिरवल्या पोरी चार,
कोणी म्हणे मी बघीतला लेडीज बार,
पण माझी तशी काही नाही इच्छा,
कारण मी रामाचा भक्त आहे सच्च्या.

पण मनात घर करून आहे इच्छा एक,
कोणतातरी अवलंबवावा मार्ग नेक,
ज्याने एकीला तरी मी तिचा वाटावा,
तीच्या मनी यावे “याच्या बरोबर संसार थाटावा”.

मार्ग वापरुन झाले बरेच,
पण निरुपयोगी ठरले सारेच,
त्या मार्गामुळे सगळ्यांनी मदतनीस मानला,
एवढा की ‘भाऊ’ या पदापर्यत आणला.

डोक्यावर हात दिलाय आता,
नवीन कोणी दिसतय काय शोधतोय येता-जाता,
वाटतय झाल्या त्या झाल्या चूका आधी,
पण वाट बघतोय यश येईल कधी.