रडलेली प्रित

तशी तू होतीस गं मनी,
पण असं काही घडेल हे नव्हतं ध्यानी,
पाहता पाहता कधी प्रित जडली,
पण विरहाने ती ही लगेचच रडली.

नजरेकडे माझ्या का दिलेस लक्षं,
आम्ही तर सारखे बदलणारे होतो पक्ष,
लक्षं दिलेस त्याबरोबर दिलेस हृदय,
बरं झालं असतं नाकारून झाली असतीस निर्दय.

मात्र पुढे तिखट प्रित लागली गोड,
भले बुद्धी म्हणाली असेल “तिला सोड”
नाही तुला कसली नोकरी की धंदा,
मुलगी असल्याने लग्नाला लागतील यंदा.

तुझ्यासाठी नोकरी खूप शोधली,
ती न मिळाल्याने स्वतःसाठी कबरही खोदली,
पण पाठी होते म्हातारे आई बाबा छोटी बहीण,
ठरवले आता त्यांसाठी जीवंत राहीन.

सल्ला आहे एकच तुला,
आता विसरून जा मला,
नवरा तुला मिळेल खूप चांगला,
तुझ्या सुगंधाणे बहरून टाक त्याचा बंगला.