विचित्र प्रेम

थोडा विचित्र असतो हा प्रेम,
पण कधीही नसतो तो गेम,
तो तर असतो तारुण्याचा एम,
कुसुमाग्रजांच्या मते तुमचे-आमचे सेम.

प्रेम असते एक भावना,
तारुण्यात येणारा पाहुणा,
जो येण्याची करतो घाई,
पण जाण्याचं नावच घेत नाही.

प्रेम असतो एक मिठासा दर्द,
प्रेमींचा एकमेकांवरील कर्ज,
ज्याच्या भाराने हृदय पार दबून जाते,
आणि शुभ-मुहूर्त काढण्याची वेळ येते.

एवढ्यावरच नाही तो थांबत,
लग्नानंतरही जातो लांबत,
पण कधी-कधी लांबीवर पडतो ताण,
तरी कमी नाही होत त्याचा मान.