व्यवहारी मन

आयुष्य माझे होते शांत,
ज्याच्या सुखात नव्हता अंत,
घर अभ्यास आणि शाळा,
जपीत होतो ध्येयाच्या माळा

पण पाहता पाहता कॉलेजचे दिवस आले,
आणि सुखाचे दिवस गेले,
प्रेमावर ऐकले अनेकांचे कीर्तन,
आणि मी ही करायला लागलो त्याचे चिंतन.

अशातच एकदा ती नजरेत पडली,
आणि माझी जलद गाडी तिथेच अडली,
मनातील ज्वालामुखी उफाळून आला,
मी नाही – ती नाही तारुण्य जबाबदार याला.

पण व्यवहारी होतो विचाराने,
भलेही बावळट असलो आचाराणे,
त्यामुळे यावर विचार केला खूप,
काही बोलण्याआधीच तोंड राहिले चूप.

शेवटी व्यवहारी पाऊले करियर कडे वळली,
आणि दुरावल्यावर ती प्रीत कळली,
तशी ती प्रेमाची वेळ होती बरी,
भले ही मी कोणीही नव्हतो जरी.

म्हणूनच आज वाटते खंत,
आयुष्य झालाय संथ,
आज अभ्यास, करियर, ती ही नाही,
आठवतोय गमवण्याचे उरले का काही.