स्वप्नाचे जग

सुंदर स्वप्नात होतो,
तिचा हात हाती घेतो,
जगण्या मरण्याचे वचन देतो,
अन् पावसात भिजायला जातो.

एवढ्यात ती गुदगुल्या करते,
आणि मला जाग येते,
पाहतो तर उठवलेले मला आईने,
पावसाने गळत होते घर,
भांडी मांडली घाईने.

स्वप्न होते खूपच गोड,
पण अवस्था सांगते तिला सोड,
जाग आल्यावर पाहिलेस सारे,
जीवन तुझे आहे खारे.

तिला जीव तर खूप लावला,
पण दैव नाही पावला,
नशीब ठरले फूटके,
अन् जीवन ठरले तुटके.

एवढी कम-नशिबी कुठली,
पहिलीच प्रीत तुटली,
असताना तिचा होकार,
समजावा लागला नकार.