संदेश

ए सुगंधी हवा,
घेऊन जा संदेश नवा,
फक्त माझ्या तिला,
हृदयाने पसंत केले जिला.

प्रेम होते तुझ्यावर सांग,
ते ही सागरापरी अथांग,
पण नशिबाने नाही दिली साथ,
आणि पहिल्या प्रेमाची खाल्ली मात.

वाटलेले प्रेमात असते सगळे माफ,
पण झाले सगळे साफ,
बाबांनी तुझ्या एकदाच पाहिला हात,
अनं क्षणार्धात झाला माझा घात.

होईल ते होईल एकदा वाटले,
पण हृदयाने तेच काटले,
बंगला गाडी कधी ही नसुदे,
किमान नोकरी तरी असुदे.

म्हणूनच अंतिम निर्णय घेतला,
जर तुझ्या बाबांचा मन जितला,
तरच तुझ्याशी लग्न करेन,
नाहीतर तुझ्याच आठवणीत मरेन.

पण एकच वाटते भीती,
वाट बघशील तरी किती ?
दोन्ही हाती हवा आहे यश,
उशीर नाही ना देणार अपयश.