आठवणींपासून सुटका

एकदा हळूच ये स्वप्नी,
काही गोष्टी ठेवल्यात जपुनी,
घेऊन जा माझ्याकडून लपुनी,
कधी हि जाऊ शकतं सारं संपुनी.

तुझ्यावर आत्यंतिक जीव लावला,
एवढा कि विरह हि भावला,
तरी भेटी साठी नेहमी राहिलो अतुर,
पण दैव भलताच निघाला चतुर.

प्रयत्न केले नि चालूच सारे,
पण फुटलेच ना नशिबाला झरे,
कोरडाच राहिला बिचारा,
जगण्यास मिळेना पाणी चारा.

आज खालावले प्रकृती बदलले आकृती,
सन्यास घेण्यास हवी स्वीकृती,
पण तुझ्या आठवणींपासून हवी सुटका,
त्या तू घेऊन गेल्यास मार्ग होईल नेटका.