आभार

माझ्या खुशीत असायची तुझी ख़ुशी,
आज का दूर राहतेस अशी,
आज नाही का माझा विचार करत,
का नाही परतीची वाट धरत.

तुझ्या नंतर पाहिली नाही ख़ुशी,
आठवणींची करून झोपलो उशी,
तरी हि झोप लागत नाही निट,
भले जागरणाचा आला वीट.

दैवाने केला सार्‍यांसमोर उघडा,
पण त्याच ख़ुशी साठी चालू हा झगडा,
जमल्यास तू हि लाव हातभार,
आयुष्यभर मानेन तुझे आभार.