नाही ना

गेलीस हसत फसउन,
पण टाकले नाहीस ना स्वतःला संपउन ?
एवढी वर्षे शोध घेतोय,
पण प्रत्तेक वेळी मात खातोय.

सोबत जगण्या मरण्याचे होते ठरले,
पण अचानक ग्रह आपले फिरले,
सहन करण्यात मी होतो पक्का,
पण तुला सहन झाला ना हा धक्का ?

पाहिले नव्हते दूर राहून,
पोट भरायचे एक मेका पाहून,
आज भले नसेल पकवान वाढले,
पण तू अन्नच तर नाही ना सोडले ?

माझ्याशिवाय तुला नव्हते आठवतं,
ध्यानी मनी मलाच होतीस साठवतं,
मी आजही उजळंल्यात आठवणींच्या ज्योती,
पण तुझी भ्रमित नाही ना झाली मती ?

मनाने हळवी होतीस फार,
सहन नव्हता होत अश्रूंचा भार,
या दुःखाने गेली असशील खचून,
पण ठेवले नाहीस ना स्वतःला आडोशी रचून ?

एवढे शोधून तू नाहीस भेटत,
म्हणून हि अशी भीती आहे वाटत,
नजरेस पडून किमान भीती दूर कर,
नंतर तुला हवा तो मार्ग धर.