जागा

तू तर दिलेलीस जागा,
पण नियतीने दिला दगा,
का करू नको त्रागा,
उजाडलय माझ्या फुललेल्या जगा.

वाईट कधी केले नाही कुणाचे,
एक सोडले तर केले नाही मनाचे,
तरी मिळाली हि शिक्षा,
मग का सोडू नये माझी कक्षा.

पण केले ना वाईट काही,
करणार नाही देतो ग्वाही,
पण तुझा शोध नेहमी करेन,
थांबेन जेव्हा आयुष हरेन.