तू सांगशील तसे

बोलशील तर स्वतःसाठी खड्डा खोदेन,
सांगशील तर स्वतःला तुझ्या पायाला बांधेन,
पण त्यासाठी तरी दाखव तुझे ठसे,
वाचन देतो होईल तू सांगशील तसे.

आता कसला अपमान आणि कसला मान,
तुझ्यातच आहे आन बाण आणि शान,
तुझ्याशिवाय मला कोणी विचारले ?
प्रेमाच्या शाळेत तुझेच नाव उच्चारले.

म्हणूनच तू गेल्यावरही बसलो ना शांत,
सोसत राहिलो दैवाचा अंत,
पण कधी बसलो ना रूसून,
तुला शोधत फिरलो आसवे पुसून.

पण सारी मेहनत गेली वाया,
कुठेच ना भेटली तुझी शीतल छाया,
शेवटी तुझ्याच चरणी आलो थकून,
आवाज दे विनंती करतोय वाकून.