मनाला समज

कशी समजूत काढू मनाची,
त्यास सवय झाले या उन्हाची,
पाय पोळले तरी काढे ना पळ,
सोसाया तयार वाट्टेल ती कळ.

सागरातील तू अनमोल मोती,
लायकी माझी हाती घेण्याची रेती,
एवढे त्यास कळते पण नाही वळत,
प्रेमासाठी सत्य स्वीकारण्यास आहे टाळत.

मानतो तुला चंद्राची कोर,
कसा सांभालेन करायचो घोर,
तसा आज हि करतो घोर,
पण आजच्यात तुला शोधण्यावर जास्त जोर.

तू आहेस मौल्यवान हिरा,
माझा तर रंग हि नाही गोरा,
दूरच राहिली तुझ्यासारखी चमक,
स्पर्श करण्याचीही माझ्याकडे नाही कुमक.

आहेत तुझ्यात परिसाचे गुण,
बदललेलेस मला हाती हात देऊन,
ते गुण अद्याप आहेत कायम,
पण ना कळे यास सृष्टीचे नियम.

कळते मी तुझ्या नाही लायक,
पण मन स्वताला समजतो नायक,
विसरण्या ऐवजी तुला शोधण्यावर जास्त भर,
त्यास समजावया आता तूच मदत कर.