एकदा बघ वळून

नाही सांगत सहजीवनी हो पुन्हा रुजू,
पण एकदा ऐकायला ये माझी बाजू,
एकतर्फी होता तू घेतलेला फैसला,
जो जबरदस्तीने होता ग्रासला.

दाखवल्या नाहीस ज्या अडचणी होतीस सोसत,
माझ्यासमोर सारखी असायचीस हसत,
माझ्या आनंदासाठी ते हसणे होते खोटे,
दिसलेच ना त्या आनंदापालीकडील तोटे.

सोबत जगण्या मरण्याचे घेतलेले वचन,
व्हायचं होत एक दुसर्‍याचे संकट मोचन,
स्वार्थी होऊन सारे काटेकोर पाळले,
पण माझ्या ज्ञानात आणायचे टाळले.

नाही शोभले तुला हे करणे,
अखेर माझ्याही नशिबी आलेच मरणे,
म्हणून सांगतो एकदा बघ वळून,
तुला सारे येईल कळून.