कसे करामते

कसे करमते तुला माझ्या शिवाय,
मला स्वप्नीही तुझाच साथ हवाय,
प्रत्यक्ष येणे शक्य नसेल,
स्वप्नी आलेले ही खरे भासेल.

अंधार पडलाय दाट,
तरी पाहतोय वाट,
माझे प्रेम दाखवेल दिशा,
येऊन सावर माझी दशा.

तुला आणायला काय धाडू,
कोणते काटे जमिनीखाली गाढू,
चंदेरी सोनेरी ना माझ्याकडे रथ,
गाडीने सावकाश ये हेच आहे मत.