तारीख – ठिकाण

दे तारीख दे वार,
कशावर होऊन येऊ स्वार ?
आदेश दे करतो विनंती,
तुझीच मर्जी चालेल सार्‍या अंती.

तुझ्या शोधात कायम मन गुंतला,
समजले तिथे तुझा शोध घेतला,
गर्दीत शोधली, आप्तेष्टांचे ठोठावले दार,
पण नेहमीच खात राहिलो नियतीचा मार.

तरीही कधी मी हार नाही मानली,
आज शब्द रूपात स्थिती तुझ्यासमोर आणली,
आहे विश्वास कधीतरी तुला कळेल सारे,
पुन्हा पाझरतील तुला प्रीतीचे झरे.

पण समजताच दवडू नको वेळ,
आधीच खूप लांबलाय हा खेळ,
तारीख – ठिकाण दे जर तात्काळ भेटणे नसेल,
तेवढ्याने ही मन थोडे शांत बसेल.