तुझी साद

भले थकून गेलीत माझी हाडे,
बघता नाही येत त्यांच्या कडे,
पण कसा बसू मी स्वस्त,
जीवनच झालय अस्वस्थ.

सुरुवातीपासूनच केली धावपळ,
सर्वांगाने सोसली कळ,
विव्हळन्याच आवाज आला हलका,
तरी चेहरा ठेवतो हसरा बोलका.

या सार्‍यात बदल हवा,
हवा आहे औषध नवा,
जो हाडांसोबत मनालाही देईल शांती,
पुन्हा घडवेल जीवनी क्रांती.

हे औषध म्हणजे आहे तुझी साद,
मिळाली तर करेन सार्‍या अडचणींना बाद,
एकदाच दे पुन्हा नाही मागणार,
ती सांभाळायला आयुष्यभर जगणार.