विरहाचे धुके

<div class=”scroll-content”>
हे विरहाचे आहे धुके,
कधी ओले कधी सुखे,
पण समोर काहीच नाही दिसत,
उलट दानवी वृत्तीने ते आहे हसत.

सारे मौसम आले गेले,
पण याने खूप उशीर केले,
बराच झुरलो त्याला घालवायला,
त्याने हि कमी नाही केली जळवायला.

आज त्याचा आहे बहर,
म्हणूनच चालू त्याचा कहर,
सारे करतोय निमूट सहन,
पण होऊ ना देणार वचनांचे दहन.

आज त्याने आहे मला गुरफटले,
बरीच वर्षे आहे फरफटले,
पण कधीतरी सुटेलच याची गुन्त,
आपल्या दुःखाचा नक्की होईल अंत.
</div>