हिशेबी

जे ना कधी होते हिशेबी ,
तेच आले आज नशिबी ,
तरी संपे ना जुन्या दिवसांची ओढ ,
कशी मांडू आता त्यांची आकडे मोड.

तुला मी मुळीच नव्हतो शोभत ,
तरी मनापासून दिलीस मला सोबत ,
प्रेमाच्या खजिन्याची केलीस लूट ,
नाते निर्माण केलेस अतूट.

पण ते ही तुला विसरणे पडले भाग ,
एकटीच सोसत राहिलीस सारी आग ,
सुंदर बनवत राहिलीस जग माझे ,
एकदा दाखवायचस मी आहे सार्‍यांवर ओझे.

बरेच गमावले या सार्‍यात ,
आता असतो एकट्याच्याच तोर्‍यात ,
हिसाबचं लागेना काय गमावले काय कमावले ,
तरी उरलेल्यात तुझ्या भेटीचे स्वप्न सामावले.