आग

भयंकर लागले हि आग,
उजाडली आपली प्रीतीची बाग,
कळे ना हिला कशी विझवू,
नुसतेच तरी डोळे किती भिजवू.

असे प्रेम सार्‍याना नाही मिळत,
थंडाव्यात हि असतात ते जळत,
पण आपल्याला मिळून हि लागले जळावे,
कळे ना का हे विरहाशी बंध जुळावे.

तरी कधी मानला ना हा बंध,
आठवणीत केवळ तुझाच सुगंध,
त्याच्याच तर शोधात दिलाय स्वतःला झोकून,
आणखी किती धरेल दैव मला रोखून.

पण एकट्याला जमले ना हि आग विझवणे,
तू हि सोड ना नियतीला धजावणे,
हि आग मिळून विझवू नक्की,
आपली प्रीत आणखी होईल पक्की.