आठवणींवर आवर घाल

तुझ्या आठवणींवर आवर घाल,
का दाखवतात गेलेला काळ ?
का तुझा विसर नाही देत पडू ?
कसा त्यांना आयुष्यातून काढू ?

तुझ्यावर प्रेम केले नाही कमी,
तरी विरहच आले जमी,
त्यालाही पळवायला खूप झटलो,
पण आता वाटते मी आहे तुटलो.

म्हणून वाटले तुझा विसर पडावा,
एकांतातील मिळावा थंडावा,
उरलेले आयुष भक्तीवर हरावे,
संन्यासी बनण्याचे मार्ग धरावे.

पण समजाव आठवणींना तुझ्या,
ज्या सारख्या होत असतात ताज्या,
माझ्यावर हे शेवटचे उपकार कर,
दैवाला नको उडू देऊ आणखी वर.