आठवणीचा प्रियकर

तुझी आठवण आहे खूप दुष्ट,
कळत नाही होतात तिच्यापासून कष्ट,
कधी दुरावेल याची बघतोय वाट,
पण ती तर सोडतच नाही माझी पाठ.

तुझी सोबत पुन्हा मिळावी, खूप वाटले,
त्यासाठी तन मन आहे खूप झटले,
पण तुला जमले ना येणे परत,
म्हणूनच होतो आठवणीला दूर सारत.

पण ती तर निघाली भलतीच शहाणी,
स्वार्थी विचार आवडते मनातील राहणी,
म्हणे तुझ्यानंतर मी पडलोय एकला,
संगे जगण्या-मरण्याचा शब्द तिने आहे राखला.

असें म्हणून सोबत असते अहो रात्र,
तुझे चित्र दाखवून भिजवते नेत्र,
या सार्‍यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो,
पण शेवटी तिचाच प्रियकर ठरतो.