आठवणीची लुट

असे काय लागलय तुझ्या हाती,
दुरावून नाही का वाटत भीती,
मला नीट झोप ही नाही लागत,
विरह व्यवस्थितपणे आहे भोगत.

जेंव्हा गेलीस मला तू सोडून,
नसलेला विरहाचा बोध आला घडून,
त्याला तात्काळ चिरडायचे ठरले,
पण नको असतानाही सोबत उरले.

चिरडण्यात, तुला भेटण्यात बरेच मार्ग पोसले,
पण ते सारे मार्ग फसले,
तरी सोडले ना प्रेमावरील दावे,
आज ही शोधतोय मार्ग नवे.

पण आज वेगळीच भीती आहे वाटत,
एवढे शोधून तू मला नाहीस भेटत,
इकडे माझे आयुष्य चालले घटत,
तिकडे दैव तुझी आठवणच नाही ना लुटत ?