आठवणीतून नाही हरवलो

कोण म्हणतो आपण दुरावलो,
आठवणीतून तर कधी नाही हरवलो,
बसल्या उठल्या सोबत असते,
रात्री झोपेत ही तीच दिसते.

भले एकांतात रडलो,
पण एकटा नाही पडलो,
सोबत असते समजूत काढायला,
तिलाच श्रेय यायला आणि जायला रडायला.

शंकाच नाही ती देईल आयुष्भर साथ,
ती ना खाणार आपण खाल्लेली लाथ,
अशीच राहशील सोबत तिच्या रुपात,
तोवर जोवर आयुष्यात होत नाही कपात.