आठवायची कारणे

प्रश्न आहे खूप मोठे,
शिवाय त्याला उत्तरांचे तोटे,
तूच सांग आता काय करू,
आयुष्याच्या परीक्षेत कशी बाजी मारू.

आयुष्य नाही लहान,
ज्याला तुझ्याच प्रीतीची तहान,
कशी ही तहान भागवू,
आणखी कसा यावर इलाज मागवू.

तुला शोधण्यात सरले एक युग,
तरी यश गिळून बसलाय मूग,
इथेही शोधून सापडेना कमी,
दोष देऊ आता कुणाच्या नामी.

हे ही जमेना म्हणून तुला विसरायची बाब ठरली,
तुझ्या सार्‍या वस्तू अन पत्रे दूर सारली,
हुडकून बाजूला काढली तुला आठवायची कारणे,
तरी कसे जमेना आठवणीचे दूर सारणे.