आयुष्य

आयुष्य आहे खूप मोठे,
त्यापेक्षा मोठे आठवणींचे साठे,
एकटे जगणे अडचणीचे नक्की ठरणार,
पण तुझ्याशिवाय कुणाचा हात ना धरणार.

कधी कुणासमोर झुकवली ना मुंडी,
ना जुमानले विरहाने केलेली कोंडी,
काल प्रमाणे आज ही तुलाच माझी मानतो,
म्हणूनच तुझ्यासाठी डोळ्यात पाणी आणतो.

पण ते लगेच टाकतो पुसून,
रुसून राहिलो ना स्वस्थ बसून,
शोधात ना घर ना तुझी आप्तेष्टे सोडली,
काही ना मिळाल्याने पत्रेही धाडली.

माहीत ना हे सारे तुला कधी कळेल,
कधी पुन्हा ध्यान माझ्याकडे वळेल,
पण तोवर मी नक्की वाट बघणार,
भले मोठे आयुष्य एकटे जगणार.