कशी नाही आठवण येणार

कशी नाही आठवण येणार,
का नाही आलाप गीत गाणार,
अक्शिदा डोईवर पडली नव्हती भले,
पण जन्मांच्या सोबतीचे वचन होते दिले.

हे सारे विसरण नाही कधी जमणार,
थांबेल श्वास पण तुझी आठवण नाही थांबणार,
कालप्रमाणे आजही मारतोय हाक,
तुझ्या आवाजासाठी थांबवले प्रगतीचे चाक.

लोक नको ती चर्चा करतात,
पण माझ्यासाठी त्या गौण ठरतात,
मला फिकीर नाही कुणाची,
पण ऐक जरा माझ्या मनाची.

मी तर तुझ्यावरच सारे आहे हरलो,
नख-शिकांत तुझ्या नावाने आहे भरलो,
म्हणूनच तू ही कधी घे माझे नाव,
चाहूल मिळताच हुडकून काढेन तुझे ठाव.