काळजी

तुझी आठवण सतावते फार,
ना सहन होत तीचा भार,
तीला मागे ठेऊन का गेलीस,
वर्षानुवर्षे ठेवलाय मला ओलीस.

कळते माझी काळजी होती,
पण ती तर घेते अती,
भेटायचीस तू ठरलेल्या वेळी,
पण तिची चालूच दिवस-रात्र पाळी.

तू गेल्यावर वाटलेही तुला विसरून जावे,
प्रगतीचे धरावे मार्ग नवे,
पण असे ना होऊ दिले हिने,
दाखवतच राहिली आपले दिवस जुने.

दोघीं पैकी कुणीतरी बदला स्वतःची चाल,
किंबहुना तूच परतून तिची समज घाल,
नका माझी इतकी काळजी घेऊ,
आता तरी द्या मला नवे गीत गाऊ.