किंमत

नाही वाटत ना तुला गम्मत,
फार मोठ्ठी मोजले आपण किंमत,
तरी कसे तुला नाही कळत,
कसे तुझे पाऊल परत नाही वळत.

दुरावले माझे घर दार,
ज्यांचा एकमेव होतो मी आधार,
इतरही कर्तव्ये दूर सारली,
मोठे बनण्याचीही इच्छा मारली.

सारी ताकद तुला शोधण्यावर जुंपली,
भीती वाटते उद्या ती नसेल ना संपली,
पडून धडपडून काहीच लागले ना हाती,
निराशा आणि शरमेने आकुंचन पावते छाती.

एकट्याच्या प्रयत्नांना मिळे ना वाव,
दिल्या हाकेला एकदा तरी धाव,
प्रेम, त्यागाची काढ आठवण एकदा तरी,
नक्की मिळेल त्यांना किंमत खरी.