घोर

नाती सारी दूर सरली,
एक तुझीच आठवण जवळ उरली,
जगण्यासाठी आहे तिचाच आधार,
नाहीतर सारीकडे माजलाय विरह अंधार.

विरहावर खूप उपाय शोधले,
जमतील तेवढे उपाय साधले,
पण सारे विरले काळाच्या ओघात,
एका पाठी एक बसतच राहिले आघात.

सारे सहिल्याने भलतच वाढलय बळ,
सोसायला तयार आयुष्याची कळ,
पण तुझ्याशिवाय मान्य ना मार्ग भलता,
मग तयार संपायला चालता-बोलता.

जगण्याची इच्छा आहे तुझ्या सोबत,
त्यासाठी इतर सार्‍या इच्छा आहे दाबत,
भले नशिबाला अपयशाने घेरलाय,
तरी आपल्या पुनर्भेटीचा घोर धरलाय.