चाललेलेच वाटते उत्कृष्ट

कष्ट सोसतोय अज्ञानात फळ,
तुझ्यासाठी सोसतोय वाट्टेल ती कळ,
कधीतरी हुंदकाही येतो ओठून,
निखळतात अश्रू ठेवलेले साठून.

कधी कळले ना दैवाचे गूढ,
आधी दिले मग उगडला सूड,
नसते दिले, असते चालले तरी,
आधी अतृप्त तरी चाललेली जीवनरेषा बरी.

लागलेली सवय नाही येत मोडता,
नाही येत विरहाशि खुषीने नाते जोडता,
विरहात हतबल बसतोय गप्प,
जीवनातले इतर व्यवहार झालेत ठप्प.

पण काही व्यवहार नित्यनेमाने आहेत चालू,
तुला आठवणे, शोधणे नि रडणे कसे भुलू,
म्हणून भले नशीब कितीही होवो रुष्ट,
सद्ध्या चाललेलेच वाटते उत्कृष्ट.