दंड

सोबत घेऊन तुझ्या आठवणींचा सुवास,
निरंतर चालू ठेवलाय हा प्रवास,
कधी संपेल हे नाही माहित,
केवळ लक्षाकडे डोळे आहे लावीत.

तुझा शोध हे एकच लक्ष,
विरह हे एकच भक्ष,
त्यासाठी तयार वाट्टेल ते सोसायला,
आणखी हि आहे तयार फसायला.

प्रवासात केला नाही खंड,
केवळ भरत राहिलो दंड,
आधी नाही नंतरही नाही केला गुन्हा,
मात्र दंड भरतोय पुन्हा पुन्हा.

असाच दंड राहीन भरत,
नवे नवे मार्ग राहीन धरत,
तोवर जोवर तू नाही भेटत,
किंवा मग डोळे नाही मिटत.