दे मदत

मित्र कुचकामी ठरले,
घरचे गरीब उरले,
तुझ्याशिवाय कोणी ना भेटला उदार,
तूच होण्यापासून वाचव नादार.

भक्ती नव्हती तेवढी दाट,
देवानेही फिरवली पाठ,
कधीच पटला नाही राक्षसी कळ,
कसा घेणार त्यांकडून बळ.

पण आधाराची अतिशय आहे निकड,
ढिली करायचीच आहे विरहाची पकड,
म्हणून शेवटी तुझ्याच आलो चरणी,
वाचवेल मला तुझीच करणी.

प्रेम केलेस माझ्यावर अतिशय,
एकदा आठवं तेच विषय,
केवळ एकदा दाखव तुझे किरण,
तेच थांबवेल माझे रोज होणारे मरण.