धागा

नाही मागत ह्रिदयात जागा,
पण बारीकसा दाखव धागा,
तुझवर पोहोचायला त्याची मदत घेईन,
अखेरचं तुला डोळे भरून पाहीन.

जीवनी आलीस बनून तुळस,
जवळचं सारं मला दिलस,
पण बाहेरच थांबलीस पावित्र्य देऊन,
निघून गेलीस आठवणींची तुळसीमाळ ठेऊन.

पण या पावित्र्याचा उपयोग काय,
या विरहाने पोळलेत पाय,
दिलेले पावित्र्य असे जाईल वाया,
गरजेची वाटते तुझी शीतल छाया.

पण तुझ्यावर करत नाही जोर,
नाही मागत मोठा दोर,
धाग्याच्या आधारानेच तुझवर येईन,
पुढचा निर्णय तिथेच घेईन.