धुसर

आता तर आशाच झाले धुसर,
काही केल्या पडे ना तुझा विसर,
कळे ना कुठे कसर राहिली,
सारी प्रयत्ने मी निट होती वाहिली.

खरे तर हि बाब शक्य नव्हती,
तरी फिरत राहिलो तिच्या भोवती,
तसा आज हि आहेच प्रयत्न करत,
आणि जमत नाही म्हणून आहे झुरत.

प्रीत आपली नव्हती साधी,
अशी क्वचितच घडली असेल कधी,
एक मेकांसाठी ओतलेली जन्मे सात,
ओतताना ना पाहिलेला धर्म ना जात.

म्हणूनच आठवणीने होते अवघड,
‘आपण एकमेकांसाठीच’ हे होते उघड,
तुला जे करायचे ते कर साकार,
पण थोडा ध्यानात घे हा प्रकार.