नको करू घोर

लिहून देऊ कि सांगू तोंडी,
नाहक केले दैवाने तुझी कोंडी,
त्याच्यात आता उरला ना जोर,
नको करू आपल्याशिवाय काही घोर.

मानतो त्याने आपणास दूर फेकले,
आपल्या मनाचे रडणे ना ऐकले,
पण त्याचेही एक चुकले,
आठवणींवर बंधन नाही आखले.

याच आठवणींनी प्रेमाला जिवंत ठेवले,
भेटी गाठीसाठी नवे मार्ग दावले,
अपयश पचऊन वाढवला धीर,
दैवाला करून सोडले असेल बधिर.

म्हणूनच प्रेमाला करू ना शकला बाद,
आता तर धरतच नाही आपला नाद,
या सार्‍या गोष्टी तू जाण,
स्वतःलाही लढण्या मैदानी आण.