नशिब

नियतीच्या तलवारीला आहे बरीच धार,
क्षणार्धात हिरावतो कोणाचाही आधार,
मी ही खाल्ला बराच मार,
पण कसा मानू मी हार.

फायदा ना नशिबाला क्रूर भासून,
प्रेम केलंय तुझ्यावर मनापासून,
मग तयार कितीही मार खायला,
मी ही बघून घेईन ‘नशिबाच्या मायला’.

म्हणूनच वर्षामागून वर्षे लोटली,
पण तुझी आठवण कधी ना तुटली,
चालूच ठेवलंय आठवणे आणि मार खाणे,
शिवाय गातोय प्रितीचे गाणे.

असाच पुढेही राहीन आलाप गीत गात,
बघूया आणखी किती करतोय तो घात,
तुझ्या भेटीसाठी तयार वाट्टेल ते सोसायला,
शिवाय तयार सारे सोसून हसायला.