न्याय

सार्‍यांचेच पकडले पाय,
पण काही केल्या मिळे ना न्याय,
एवढा काय घडला गुन्हा गंभीर,
कि दैवही राहिला त्याच्या जागी खंबीर.

आता तूच दाखव प्रेमाचा न्यायालय,
तेच असेल मला देवालय,
जिथे भरेन तुझ्यावर खटला,
कसा तुला विरहाचा मार्ग पटला.

मीच करेन वकिली,
कारण माझीच प्रीत राहिले भुकेली,
वर्षांचा अनुभव आहे जमी,
खटला जिंकण्या ते येइलच कामी.

न्यायदेवता असतील समोर बसले,
सांगेन माझे प्रेम आहे फसले,
सांगताना जमणार ना डावपेच युक्ती,
पण माझ्या पारड्यात असेल तुझी भक्ती.

तुलाही बोलण्याची दिली जाईल संधी,
एकदम केली ना जाणार बंदी,
तुला पिंजर्‍यात केली जाणार उभी,
ऐकल्या जातील तुझ्याही बाबी.

आधी मला तू प्रेमात हसवले,
हसऊन मग दुराऊन रुसवले,
स्वतःवर ओढावलेस सार्‍यांचे वाद,
नंतरच्या शोधाला हि दिलीस ना दाद.

आसीम प्रेम वचने आणि आठवणींची साक्ष,
मजबूत वाटतो माझा पक्ष,
तुझ्याकडे उरले केवळ मार आणि हार,
कशी असेल तुझ्या पक्षाला धार.

बघूया कुणाचे पारडे होते जड,
बघू दे दैवाला आपली तडफड,
न्यायदेवतेच्या निर्णयाला दोघांनी देऊ मान,
पण त्यासाठी स्वतःला न्यायालयात आण.