पकड माझी दिशा

तुझा आवाज ऐकायला तरसलेत कान,
आठवते त्यास जगण्या-मरण्याची आण,
त्यासाठी पणाला लावली आण बाण शान,
तरी अपूर्णच राहिले ते वान.

तरी कधी नाही स्वस्त बसलो,
केवळ चेहर्‍यानेच सार्‍यांशी हसलो,
चालूच तू आणि तुझ्या शोधाचा घोर,
तरी कमी ना होई नशिबाचा शीर जोर.

कळते मी होतो थोडा चुकलो,
अल्लडबाजीने होतो माखलो,
तुझ्या कमीने झाली सार्‍याची जाणीव,
शर्थीने लढलो भरून काढाया हि उणीव.

पण काही केल्या यश मिळेना,
आणखी काय करू हे हि कळेना,
आता तुझ्यावरच सोडले आशा,
जमल्यास तूच पकड माझी दिशा.