पाऊल-खुणा

एकदाच दाखव पाऊल-खुणा,
काहीच मागणार नाही पुन्हा,
असलेलेही करेन अर्पण जर असेल हवे,
पण शेवटचे तरी तू भेटून द्यावे.

कित्तेक वर्षे तुला शोधली,
ऋतुंची झाली बदलीवर बदली,
पण माझी दशा सारखीच राहिली,
तुला आठवण आणि स्वप्नीच पहिली.

तरी हट्ट नाही सोडले,
हाल सारे तुझ्यासमोर मांडले,
नाही माहित कळले कि नाही कळले,
पण आशेचे किरण नेहमीच पाळले.

करण्याची गरज नाही तुला जास्त,
सुचवलेला उपाय आहे स्वस्त,
केवळ पाऊल-खुणाच मागे ठेव,
बघेन कसा ना भेटवतो आपल्याला देव.