पुन्हा एकदा

एकदा मनात बघ विचार आणून,
पुन्हा बघ माझी प्रेयसी बनून,
इतिहासाला आता देऊ शकतो मात,
आता ना होईल नियतीचा घात.

मिळाली आता भरपूर सजा,
व्हायची तेवढी झाली इजा,
आता उपचाराची आहे गरज फार,
प्राण घेईल आणखी मिळालेला मार.

आजवर प्रयत्नांची केली शर्थ,
एकदा भेटून दे त्यांना अर्थ,
मनातले प्रेम एकदा डोळ्यात आण,
जीवन सारे तुलाच दिलय हे पक्क जाण.

अशी आयुष्यभर वाट बघेन,
तुझी आठवण सोबत घेऊन जगेन,
तुला नियतीला कधीतरी येइलच माझी दया,
नाहीतर पर्याय आहेतच काशी-गया.