प्रश्न

जेवताना अडकतोय घास,
आठवणीत तुझ्या प्रत्येक श्वास,
तुला नाही होत का हे ज्ञात,
कुठे राहिले तुझे मदतीचे हात.

कधीच एकटे नव्हते सोडले मला,
अडचणी ओळखण्याची होती कला,
विविध असायची त्यांची रूपे,
पण त्यावर उत्तर तुझे साधे सोपे.

असाच हा ही प्रसंग आहे बाका,
म्हणूनच तुला मारतोय हाका,
हा विरह आता पडेना पचनी,
तूच हाती घे आता चाचणी.

एकदा तरी भेट घडावी आपली,
ही अन्तेछा मनावर आहे छापली,
काही केल्या प्रश्न मला नाही सुटत,
बघ तुझ्याने तरी आहे काय मिटत.