प्रितीचा घाट

अवघड हा प्रितीचा घाट,
निराशेची शक्यता दाट,
मित्रांनी अडवली वाट,
पण माझी गाडी होती सुसाट.

वेग मनाला चांगला भावला,
तन – मनाच्या आकाशात मावला,
दिसलाच ना घातकी कावळा,
नियतीच्या कचाट्यात घावला.

समजले तिथे झाली फडफड,
आले ध्यानी झाली मोठी गडबड,
पण तोवर झालेली आयुष्याची पडझड,
तिथेच सुरु झाली तुझ्या गीतांची बडबड.

आता दिसेना कोणती दिशा,
पण सोडली ना तुझी आशा,
आठवणीला केले नशा,
फिकीर ना जी होईल दशा.